मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ईशा केसकर व अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत ईशा व अक्षर कोठारी व्यतिरिक्त अभिनेत्री किशोरी अंबिये, दीपाली पानसरे असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

सध्या या मालिकेच्या वेळेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे जयदीप-गौरीची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अशातच आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ नाही तर दुसरीच मालिका ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाडीवर चढून चाहत्यांनी…; ‘एक होता विदूषक’च्या चित्रीकरणाच्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमची…”

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच मनोरंजन करत असलेली आणि एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. या मालिकेच्या वेळेत म्हणजेच १० वाजता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आहे. पण याबाबत अद्याप अधिकृतरित्या वाहिनीकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा – Laxmikant Berde Birthday: मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका २०२१ला प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धत ही प्रेक्षकांना चांगलीच आवडली. अप्पू, शशांक, माई, अण्णा अशा अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस उतरल्या. त्यामुळे ही लोकप्रिय मालिका खरंच प्रेक्षकांचा निरोप घेणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.