अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ १६ नोव्हेंबरपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. याचे प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत. नुकताच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील तेजस आणि मानसीचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये तेजस मानसीला प्रपोज करताना दिसत आहे.

‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणतो, “सोलापूरी भाषेत तुला मानसीला प्रपोज करायला आवडेल का?” त्यानंतर तेजस मानसीला प्रपोज करताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो

तेजस सोलापुरी भाषेत मानसीला म्हणतो की, मुंबईत काय नाही ठेवलंय? मानसी म्हणते, “मुंबईत तू काय फिरला आहेस?” त्यानंतर तेजस म्हणतो, “आमच्याकडे लय भारी गुटके आहेत.” मानसी विचारते, “काय आहेत?” तेव्हा तेजस म्हणतो, “तुला शेंगदाण्याची चटणी देतो. वाळलेली भाकरी देतो. तुला पाहिजे ते देतो.” त्यावर मानसी म्हणते, “पार्कात बसून चहा प्यायला आहेस का?” तेजस म्हणतो, “पार्कात बसून चहा कुठे पितात?”

त्यानंतर मानसी म्हणते, “मी तुला अजिबात भाव देत नसते.” त्यावेळी तेजस म्हणतो की, मी बार्शीचा आहे. बार्शी तिथे सरशी. आता चॅलेंज म्हणून घेतो. तुला नाही काढून दाखवलं तर बघ. हे ऐकून मानसीला धक्काच बसतो. ती म्हणते, “काय? तू मला काढून दाखवणार?”

हेही वाचा – “लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

हेही वाचा – Bigg Boss 18मध्ये इन्फ्लुएन्सर, इकडे गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर केली ब्रेकअपची घोषणा, सात महिन्यात संपलं नातं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या पहिल्या भागात ‘स्टार प्रवाह’वरील नायिका आणि नायकांमध्ये सांगीतिक लढत होणार आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजस-मानसीसह ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील हृषिकेश-जानकी, ‘मुरांबा’ मालिकेतील अक्षय-रमा, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मधील अद्वैत-कला, ‘येड लागलं प्रेमाचं’मधील राया-मंजिरी तसंच आगामी नव्या मालिकेतील एक जोडी पहिल्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या पहिल्या भागात नायिका की नायक कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेच आहे.