तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दोघांच्या विवाहसोहळ्यातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच सिद्धार्थ बोडकेने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर अवघ्या काही दिवसांतच तितीक्षा-सिद्धार्थने कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली होती. आज शूटिंगमधून वेळात वेळ काढून अभिनेत्रीने नवऱ्यासाठी खास जेवणाचा बेत केला होता. याचा फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : Crew : तब्बू, करीनाच्या ‘क्रू’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; आक्षेपार्ह शब्द हटवले, जाणून घ्या…

तितीक्षाने सिद्धार्थसाठी मच्छी फ्राय, कोळंबी फ्राय, भात, रस्ता असं मांसाहारी जेवण केलं होतं. जेवणाच्या ताटाचा खास फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला “धन्यवाद बायको…” असं कॅप्शन देत सिद्धार्थने या फोटोवर “कोकण…कोकण” हे गाणं लावलं आहे. तितीक्षा कोकणातली असल्याने तिने नवऱ्यासाठी मालवणी पद्धतीचं जेवण बनवलं होतं.

siddharth bodke
सिद्धार्थ बोडके इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ स्टार प्रवाहची महामालिका, तर अर्जुन-सायलीला मिळाला ‘हा’ पुरस्कार, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तितीक्षा आणि सिद्धार्थच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर, सिद्धार्थ बोडके आता लवकरच ‘जेएनयू’ चित्रपटात झळकणार आहे.