TMKOC Fame Dilip Joshi Says He Misses Disha Vakani : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली १७ वर्षे ही मालिका आणि त्यातील कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहेत. आता मालिकेला प्रदर्शित होऊन मोठा काळ लोटल्याने त्यानिमित्त कलाकार मुलाखतीमध्ये मालिकेबद्दल व्यक्त झाले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सर्व कलाकारांनी नुकतयाच दिलेल्या मुलाखतीमधून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘स्क्रीन’शी संवाद साधताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी च्याही आठवणी सांगितल्या. या मुलाखतीमध्ये दिलीप जोशींना तुम्हाला दिशा वकाणीची आठवण येते का, असं विचारण्यात आलं होतं.
दिलीप जोशी यांना येते दिशा वकानीची आठवण
दिलीप जोशी म्हणाले, “आम्ही २००८ पासून २०१७ पर्यंत काम केलं. त्यामुळे हा खूप मोठा काळ आहे. अनेक वर्षं आम्ही एकत्र काम केलं. आम्ही खूप चांगले सीन एकत्र केले आहेत. तिची आणि माझी अभिनयाची पार्श्वभूमी एकच आहे. तिनंही रंगभूमीवर काम केलं आहे आणि मीसुद्धा केलं आहे.”
दिलीप जोशी पुढे म्हणाले, “त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आमची केमिस्ट्री रंगली होती. खूप चांगली कथा, संवाद, सीन आमच्या वाट्याला आले. ते करताना खूप मज्जा आली. त्यामुळे कलाकार म्हणून मला तिची खूप आठवण येते. ती जी केमिस्ट्री होती, सीन असायचे ते करायला मला खूप आवडायचं.”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं १७ वर्षांचं यश साजरं करण्यानिमित्त खास सेलिब्रेशनही करण्यात आलं. यावेळी यामधील सर्व कलाकारांनी केक कापून हे सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान दिलीप जोशी यांचे वडीलदेखील उपस्थित असल्याचं दिसलं.
दिलीप जोशी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. गेली कित्येक वर्षं त्यांनी जेठालाल हे पात्र साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यांच्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामधील त्यांची व दिशा यांची केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडायची.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. त्यातील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहतावर्ग आहे आणि त्यातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. आजही अनेक जण युट्यूबवर याचे जुने भाग पाहताना दिसतात.