‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त सिनेसृष्टीत नव्हे तर राजकीय पातळीवरही हा कार्यक्रम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांनी विविध गोष्टींवर गौप्यस्फोटही केले. नुकतंच या कार्यक्रमात तृतीयपंथी लोकांसाठी झटणारी, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित लवकरच ताली ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेत्री सुश्मिता सेन ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात ती ट्रान्सजेंडर असलेल्या गौरी सावंत यांची भूमिका साकारत आहे. याच निमित्ताने गौरी सावंत ही बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने अभिनेता आणि होस्ट सुबोध भावे याच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली.
आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यावेळी तिने सहज गप्पांच्या दरम्यान तृतीयपंथी टाळी का वाजवतात? याबद्दलचे गुपित उलगडले. त्यामागे नेमकं कारण काय असते याचा खुलासाही गौरी सावंत यांनी केला. सिग्नलवर किंवा ट्रेनमध्ये जे तृतीयपंथीय टाळी वाजवतात ती टाळी सर्वसामान्य टाळ्यांप्रमाणे नसते, असे त्या म्हणाल्या.

तृतीयपंथी जी टाळी वाजवतात ती सुखकर्ता दुख:हर्ता अशा आरतीसाठी वाजवतात त्याप्रकारे नसते. त्या टाळीमागचा आक्रोश तुम्हाला कळायला पाहिजे, मी काय आहे हे सिद्ध करण्यासाठी.. ती टाळी आहे, असे त्यांनी म्हटले. अजून किती वर्ष ही टाळी वाजवायची हा मला अजूनही प्रश्न आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा : वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या “तुमच्यासारखा बाप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नुकतंच सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर केला आहे. या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत.