Ruchira Jadhav Draw Virat Kohli Sketch : विराट कोहली… क्रिकेट क्षेत्रातलं एक लोकप्रिय नाव. विराटनं आजवर त्याच्या कामगिरीनं जगभरात आपला एक चाहतावर्ग कमावला आहे. विराटचे केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर रिअल लाईफमध्येही असंख्य चाहते आहेत. अशातच विराटचा ५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. लाडक्या विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी आपपल्या पद्धतीनं त्याला शुभेच्छा दिल्या.

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनंही विराटला वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. ही अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. रुचिरा सोशल मीडियाद्वारे तिचं विराट प्रेम व्यक्त करत असते. अशातच तिनं विराटला तिच्याकडून खास अंदाजात शुभेच्छा दिल्या.

रुचिरा जाधव ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर रुचिरा तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिनं शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रुचिरानं विराटच्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या हातांनी स्केच काढलं आणि हे स्केच काढतानाचा व्हिडीओ तिनं आपल्या सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मालिकेच्या सेटवर वेळ मिळेल तसा स्केच काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शूटिंगच्या व्यग्रतेतून वेळ काढत तिनं विराटचं स्केच काढलं आहे.

स्केच काढतानाचा व्हिडीओ शेअर करत रुचिरा म्हणते, “माझ्या… आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विराटचा वाढदिवस आहे, मी मालिकेच्या सेटवर आहे, शूटिंग करत आहे, मला खूप दिवसांपासून विराटचं स्केच काढायचं होतं पण संधी मिळाली नाही. पण, मला हा क्षण गमवायचा नाही, त्यामुळे मी विराटचं स्केच काढणार आहे.”

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रुचिरा म्हणते, “विराट, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू क्रिकेटच्या आकाशातील सूर्य आहेस. प्रत्येक डावासोबत तू आणखी उजळत राहो आणि आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहो. माझ्या कलाकृतीतून तुला दिलेली एक छोटीशी भेट. #RuchiraSays परफेक्ट नसलं तरी चालेल, पण ही खास गोष्ट मनापासून मनासारख्या व्यक्तीसाठी केलेली आहे.”

रुचिरा जाधवनं स्वत:च्या हातांनी काढलं विराट कोहलीचं स्केच

दरम्यान, रुचिरा जाधवच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती टीव्हीवरेल लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची झी मराठी टीव्हीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’ या शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसंच तिनं काही सिनेमांतही काम केलं आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात ती लावण्या ही नकारात्मक भूमिका साकारत आहे.