Tula Shikvin Changalach Dhada : चारुलता सूर्यवंशीच्या घरात आल्यापासून सतत वाद होताना दिसत आहेत. जन्मदाती आई असलेल्या चारुलताला अधिपती अजूनही स्वीकारत नाहीये. तरी देखील चारुलता सातत्याने आपल्यापरीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. पण यामुळे सूर्यवंशीच्या घरात वाद होत आहेत. म्हणूनच चारुलताने सूर्यवंशीचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अक्षराने एक वचन देऊन चारुलताला घराबाहेर जाण्यापासून रोखलं आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा ( Tula Shikvin Changalach Dhada ) नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चारुलता घर सोडून जाताना दिसत आहे. पण तितक्यात अक्षरा येते आणि तिला थांबून एक वचन देते. तर दुसऱ्याबाजूला अधिपती एक निश्चय करताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video: “तो आता गजनी झालाय”, निक्की आणि अभिजीतचा खेळ पाहून सूरजचा टोमणा, नेमकं काय घडलं? पाहा
प्रोमोमध्ये चारुलता विचार करत म्हणते, “नाही…नाही…माझ्यामुळे घरात रोज भांडणं होतायत. माझा संसार असून नसल्यासारखाच आहे. घरातील अस्थिरतेसाठी मी कारणीभूत ठरायला नको. आता मला पाऊल उचलावचं लागले.” त्यानंतर चारुलता बॅग घेऊन घराबाहेर जाताना दिसत आहे. पण तितक्यात अक्षरा थांबवते आणि म्हणते, “आई थांबा.” तेव्हा चारुलता म्हणते, “मी या घरात कोणत्या अधिकाराने थांबू? आमच्यात खूप मोठा गॅप आलाय, हे मला जाणवतंय.” त्यावेळेस अक्षरा चारुलताचा हातात घेऊन म्हणते, “मी तुम्हाला वचन देते की तुमच्या या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुमचं आणि बाबाचं पुन्हा लग्न लावून देईन.” ( Tula Shikvin Changalach Dhada )
दुसऱ्या बाजूला अधिपती रडत भुवनेश्वरीच्या फोटोला बघून म्हणतो, “भुवनेश्वरी सूर्यवंशी तुम्ही आम्हाला का बरं सोडून गेलात? हा निर्णय तुमचा सपशेल चुकला आहे. तुमच्या नजरेचा तो दरारा, तो धाक, ती माया आम्हाला परत पाहिजे. तुम्ही या. तुमची या घरातली जागा मी कोणालाच घेऊ देणार नाही”, असा निश्चिय अधिपती करतो. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतंय? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे. ( Tula Shikvin Changalach Dhada )
पाहा प्रोमो
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) मालिकेतील भुवनेश्वरी, अक्षरा, अधिपती, चारुहास, दुर्गेश्वरी ही पात्र चांगलीच गाजली आहेत. अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलारने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर, दिप्ती सोनावणे असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.