‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी खास बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मलायका अरोरा यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘तू चाल पुढं’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पण यामध्ये ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकून चांगलीच बाजी मारली.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला एकूण १० पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष – फुलपगारे सर, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – भुवनेश्वरी, सर्वोत्कृष्ट आजी – अधिपतीची आजी, सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी, सर्वोत्कृष्ट जावई – अधिपती, विशेष लक्षवेधी चेहरा – अक्षरा, सर्वोत्कृष्ट जोडी – अक्षरा-अधिपती, सर्वोत्कृष्ट नायिका – अक्षरा, सर्वोत्कृष्ट नायक – अधिपती शिवाय सर्वोत्कृष्ट मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ठरली. याचनिमित्ताने मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊत हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊत हिने काही फोटो शेअर करत लिहीलं, “मी आणि तेजसने एक स्वप्न बघितलं होतं..माझ स्वप्नं निर्माती व्हायचं आणि तेजसच व्यवसाय करायचं..एकमेकांना पाठिंबा देत प्रवास सुरू केला.. यात माझी मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी हिने मोलाची साथ दिली…तिच्या शिवाय हा प्रवास सुरू झाला नसता..नवीन असून पण आमच्यावर विश्वास ठेवला तो म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीने आणि हळू हळू आमची टीम बनायला सुरुवात झाली..”

हेही वाचा – ‘गालिब’ नाटकात गौतमी देशपांडे साकारणार ‘ही’ भूमिका; दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरसह काम करताना अभिनेत्रीला आला ‘असा’ अनुभव

“हेमंत सोनवणे आणि मनाली कोळेकर हे आमचे लेफ्ट आणि राइट हॅण्ड बनले..डिरेक्शनची टीम, चंद्रकांत गायकवाड सर कॅप्टन ऑफ द शीप बनले..एडिटर उमेश,पोस्ट प्रोडक्शन रोशन, प्रॉडक्शन टीम, मेकअप, हेअर, कॉस्ट्यूम, डिओपी विनायक जाधव, लाइट टीम, स्पॉट टीम, आर्ट टीम, माझे लाडके आर्टिस्ट यात शामिल झाले आणि मी आणि तेजसने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ नावाचे जहाज पाण्यात उतरवले.. रसिक प्रेक्षक मायबाप यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तुम्हा सगळ्यांमुळे यावर्षीची सर्वोकृष्ट मालिका म्हणून आम्हाला पारितोषिक मिळाले..मी एवढंच म्हणेन तेजसने आणि मी एकमेकांना पंख दिले त्यांना बळ मधुगंधाने दिले आणि उडण्यासाठी झी मराठीने आकाश मोकळं करुन दिलं…धन्यवाद आई, बाबा, सुप्रिया, निरंजन आणि माझं प्रेम तेजस,” असं शर्मिष्ठाने लिहीलं आहे.

हेही वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीत काय घडणार?, पाहा प्रोमो

View this post on Instagram

A post shared by Sharmishtha Raut- Desai (@sharmishtharaut)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शर्मिष्ठा राऊत हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘सुखाच्या सरीने हे मनं बावरे’, ‘सारं काही तिच्यासाठीट, ‘अबोली’ या मालिकांमध्ये ती झळकली होती.