‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील नव्या ट्विस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

मालिकेच्या कथानकानुसार गेली अनेक वर्षे अधिपतीचे वडील चारुहास आजारी असतात. त्यांना व्यवस्थित बोलताही येत नसतं. आपल्या सासऱ्यांना या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी अक्षरा खूप प्रयत्न करत असते. भुवनेश्वरी व अधिपतीचा विरोध पत्करून अक्षरा चारुहासला बरं करण्यासाठी धडपड करत असते. शेवटी आजच्या (९ जानेवारी) भागात चारुहासची वाचा परत आल्याचं पाहायला मिळालं. इंजेक्शनच्या डोसमुळे अक्षराचे सासरे बरे होतात. नायिका देवीची प्रार्थना करत असताना ते तथास्तु म्हणत सुनेला आशीर्वाद देतात.

हेही वाचा : जाऊ बाई गावात : आजारपणानंतर सागर कारंडेचं कमबॅक! पोस्टमन काकांना पाहून स्पर्धक भावुक, व्हिडीओ व्हायरल

आजारपणातून बाहेर काढल्याबद्दल चारुहास अक्षराचे मनापासून आभार मानतो. तसेच या घरावर सर्वात मोठा अधिकार माझा आहे असं तो सुनेला सांगतो. चारुहास आपल्या सुनेसमोर भुवनेश्वरीच्या भूतकाळाबद्दल खुलासा करणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये तो अक्षराशी स्पष्टपणे बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भुवनेश्वरी खरी कोण आहे? याचं गुपित चारुहास सुनेला सांगणार आहे. आता भुवनेश्वरी ही चारुहासची खरी पत्नी नसून तिने त्याच्या पत्नीची जागा कशी बळकावली हे रहस्य चारुहासला अक्षराला सांगायचं असतं. काही दिवसांपूर्वीच्या भागात भुवनेश्वरी आपण या घरात २५ वर्षे संसार केल्याचं सांगत होती. यावेळी अक्षराने अधिपतीचं वय २७ असल्याने तुमचा संसार ३० वर्षे असेल असं तिच्या लक्षात आणून दिलं होतं.

हेही वाचा : उस्ताद रशिद खान यांचं निधन, संगीत क्षेत्रातला तारा निखळला, कर्करोगाशी झुंज अपयशी

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारुहास भुवनेश्वरीचा संपूर्ण खोटेपणा उघड करेल का? भविष्यात अधिपती अक्षराला समजून घेईल की नाही. हा संपूर्ण सीक्वेन्स पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.