टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (२७ डिसेंबर) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खानविरोधात तक्रार दिली आहे. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तिच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकार यावर व्यक्त होताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री मानसी नाईकने याबद्दल भाष्य केले आहे.

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सातत्याने चर्चेत आहे. तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातच तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मानसी नाईकने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या पालकांना वचन दिले आहे.
आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे फोटो शेअर केले आहे. याला कॅप्शन देताना मानसीने अप्रत्यक्षरित्या तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केले आहे. “या जगात हार मानणं खूप सोप आहे. पण मी माझ्या पालकांना वचन दिलं आहे की मी कधीच हार मानणार नाही. तसेच कोणत्याही गोष्टी सोडणार नाही. माझ्या इच्छाशक्तीला कमी लेखू नका. वाईट वेळ ही प्रत्येकाची येते. आज ती वेळ माझी आहे.”

“माझं हृदय माझ्या आईशी जोडलं गेलेलं आहे. तिने नऊ महिने त्यासाठी मेहनत घेतली आहे. मी वाढत आहे आणि चमकत आहे. मी कोणतीही समस्या नाही. आई-बाबांची लाडकी राजकन्या.” असे मानसी नाईकने म्हटले आहे.

आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.