तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण रोज नवीन वळण घेताना दिसत आहे. २४ डिसेंबरला तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर कलाविश्वातील सेलिब्रिटींप्रमाणेच राजकीय नेतेही व्यक्त होताना दिसत आहेत. नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुनिषाच्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल, असा विश्वास रामदास आठवलेंनी तिच्या आईला दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या शर्माच्या आईची भेट घेतली. शिझान खानला कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांची भेट घेणार आहे. तुनिषाचा विश्वासघात केलेल्या शिझानला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी दिली गेली पाहिजे”, असं रामदास आठवले म्हणाले. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत करावी तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे तीन लाख रुपयांची सांत्वनपर मदत रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केली.

हेही वाचा>>राजेश खन्ना यांनी लेकीच्या जन्मानंतर सहा महिने पाहिलाच नव्हता तिचा चेहरा, कारण…

तुनिषाने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. २७ डिसेंबरला तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत तुनिषा व तिचा बॉयफ्रेंड शीझान खान मुख्य भूमिकेत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप केल्याने नैराश्यातून तुनिषाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने शीझानवर केला आहे.

हेही वाचा>>“तुनिषा शर्माचा खून…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा उल्लेख करत बॉलिवूड अभिनेत्रीचं ट्वीट

हेही वाचा>>‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने शेअर केला रायगडावरील फोटो, म्हणाला “सांगा सरकार…”

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिझान खानला सुरुवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यात वाढ करुन ३० डिसेंबरपर्यंत शिझान पोलीस कोठडीत असणार आहे. पोलीस चौकशीदरम्यान शिझानने तुनिषाबरोबर ब्रेकअप केल्याचं खरं कारण अद्याप सांगतिलं नसून तो सतत जबाब बदलत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma suicide case union minister ramdas athawale meet her mother says sheezan khan should be hanged kak
First published on: 29-12-2022 at 15:32 IST