प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवल्याचं कळतंय. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.

तुनीषा शर्माने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास लावला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं होतं, पण रस्त्यातच तिचं निधन झालं.

“तिने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा आम्ही तपास करत आहोत,” अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली. ‘अलिबाबा:दास्तान ए काबुल’ या टीव्ही मालिकेत ती मुख्य भूमिका करत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सोनी सब टीव्ही मालिका अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव्ह’ ही मालिका लोकांना खूप आवडली होती.