मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अमृता देशमुख-प्रसाद जवादे, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांच्यानंतर सध्या अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंदी टिकेकर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघींच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून त्यासंदर्भातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वडील उदय टिकेकर यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.

“टिकेकर आणि कुलकर्णी कुटुंबातील मेहंदीची क्रेझी संध्याकाळ”, असं लिहित स्वानंदी टिकेकरने मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. ज्यामध्ये स्वानंदी आणि तिचा होणारा नवरा आशिष कुलकर्णीने लाल रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय स्वानंदी वडील उदय टिकेकर यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा – Photos: गौतमी देशपांडेला लागली स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद; पाहा खास फोटो

दरम्यान स्वानंदीची आई म्हणजेच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचा देखील मेहंदी सोहळ्यातील डान्स व्हायरल झाला आहे. ‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर स्वानंदीच्या आईचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

स्वानंदी-आशिष उद्या, २५ डिसेंबर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच स्वानंदीने आशिषबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघांच्या कपाळावर मुंडावळ्या आणि गळ्यात हार घातलेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात बहीण मृण्मयीचा जबरदस्त डान्स, पाहा खास क्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर ती ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमध्ये झळकली. तिचा होणारा नवरा आशिष कुलकर्णी हा गायक आहे. ‘इंडियन आयडॉल १२’मध्ये तो झळकला होता.