scorecardresearch

कंगनाच्या ‘लॉकअप २’मध्ये जाण्याबद्दल उर्फी जावेदने सोडलं मौन; म्हणाली, “माझ्याशिवाय तुमचं…”

उर्फी जावेद कंगना राणौत होस्ट करत असलेल्या लॉकअप शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या आहेत चर्चा

Urfi javed, uorfi javed, uorfi javed in reality show, uorfi javed look, uorfi javed bold look, hindi tv shows, khatron ke khiladi, urfi javed, urfi, rohit shettys khatron, lock upp, kangana ranaut show lock upp
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अर्थात यामुळे तिला अनेकदा ट्रोल व्हावं लागलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. ती दर दिवशी एका वेगळ्याच आउटफिट्समध्ये दिसते. नुकताच तिचा एक लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पण यावेळी ड्रेस नाही तर कंगना रणौतच्या रिअलिटी शोमुळे उर्फी सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्फीने नुकतीच कंगनाच्या शोमध्ये सहभागी होण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेद लवकरच कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या सगळ्या चर्चांवर उर्फी जावेदने आता मौन सोडलं आहे. तिने या सगळ्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाचा रिअलिटी शो ‘लॉकअप २’साठी मेकर्सनी उर्फीला विचारणा केल्याचं बोललं जात होतं. या सर्व अफवा असल्याचं सांगत उर्फीने या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- Video: उर्फी जावेदने तिच्या हटके ड्रेसचं केलं नामकरण, कतरीना कैफच्या ‘या’ गाण्यावरून दिलं नाव, म्हणाली…

कंगनाच्या शोमध्ये सहभागी होणार आहेस का? असा प्रश्न काही पापाराझींनी विचारल्यानंतर उर्फी म्हणाली, “माझ्याशी या रिअलिटी शोच्या मेकर्सकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही आणि मलाही त्या शोमध्ये जाण्याची इच्छा नाही. जर मी दोन किंवा तीन महिन्यांसाठी कुठे बाहेर गेले. तर तुम्ही सगळे माझ्याशिवाय काय कराल.” असं म्हणत तिने पापाराझींची मस्करीही केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 18:17 IST