उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या अतरंगी आणि विचित्र कपड्यांमुळे ती अनेकदा ट्रोलही होताना दिसते. काही वेळा तर उर्फीला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळालेल्या आहेत. पण तरीही तिच्यावर यातील कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. रोज काहीतरी नवीन आउटफिट्स घालून ती लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरते. नुकताच तिने घातलेला जीन्सचा ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अशात आता उर्फीने तिच्या कपड्यांबाबत खूपच विचित्र इच्छा व्यक्त केली आहे.

उर्फी जावेदला नुकतंच एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट केलं गेलं. यावेळी तिने जीन्सचा वापर करून तयार करण्यात आलेला अतरंगी टॉप परिधान केला होता. जेव्हा तिला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की त्या दिवसासाठी तिचे जे आउटफिट्स होते ते खराब झाले त्यामुळे तिने तिची जीन्स कापून त्यापासून हा टॉप तयार केला.

आणखी वाचा- Video: उर्फी जावेदचा कारनामा, पायात नाही तर हातात घातली जीन्स; अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ पाहिलात का?

यावेळी उर्फीला तिच्या पुढच्या आउटफिट्सबद्दल विचारण्यात आलं. ‘अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यापासून तिने अद्याप कपडे तयार तयार करून परिधान केलेले नाहीत?’ त्यावर उर्फीने खूपच विचित्र उत्तर दिलं. ती म्हणाली, “मानवी चामडी अजून बाकी आहे. जर कोणाला मारुन त्या व्यक्तीची चामडी मिळाली तर किती चांगलं होईल ना? मी मानवी त्वचेपासून ड्रेस तयार करून तो परिधान करेन. जर कोणी व्यक्ती मला स्वतःची त्वचा काढून देणार असेल तर मी नक्कीच मी त्याचा ड्रेस तयार करेन.”

आणखी वाचा- लग्नाबद्दल बोलत होता रितेश देशमुख; मागून बायको आली अन्…, पाहा नेमकं काय घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स उर्फीवर संतापले आहे. त्यांनी तिच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान उर्फीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण बिग बॉस ओटीटीमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अलिकडेच ती MTV Splitsvilla 14 मध्येही दिसली होती.