‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा प्रवास आज संपणार आहे. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेलं हे पर्व आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या पर्वाचा नुकताच ग्रँड फिनाले सुरू झाला आहे. तब्बल सहा तास हा फिनाले रंगणार आहे, सदस्यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहे. तसेच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी या ग्रँड फिनालेला हजेरी लावणार आहेत. सध्या अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या टॉप पाच सदस्यांमधून कोण जिंकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ग्रँड फिनालेनिमित्ताने विकी जैनने अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

विकी जैनने ग्रँड फिनालेपूर्वी अंकिताबरोबर एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये विकी व अंकिता हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विकीने लिहिलं आहे, “आपण सुख, दुःखात बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे. तुझं काम प्रेरणादायी आहे. आपल्यासमोर ज्या अडचणी येतील, त्या तू व्यवस्थितरित्या हाताळशील यात काही मला शंका नाही. मी तुझ्याबरोबर आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale: अंकिता लोखंडे नाही तर ‘हा’ सदस्य होणार ‘बिग बॉस १७’चा विजेता! टॉप-३ कोण जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Vikas Jain (@realvikasjainn)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “विकी तू बरोबर होतास. पण अंकिताने अटेन्शनच्या नादात तुला वाईट बनवलं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ग्रीन फ्लॅग नवरा. तू नेहमी पत्नीला पाठिंबा देत असतोस.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नेहमी एकत्र राहा आणि आनंदात राहा.”

हेही वाचा – “जिन्यावरून ढकललं अन् मग…”, ९ वर्षांची असताना आयशा खानचा झाला होता विनयभंग, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली…

दरम्यान, विकी ‘बिग बॉस १७’मधून बाहेर आल्यापासून अंकिताला पाठिंबा देताना दिसत होता. सतत चाहत्यांना अंकिताला मत देण्यासाठी आवाहन करत होता.