‘मधुबाला’, ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ सारख्या कार्यक्रमांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता विवियन डिसेना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विवियनने २०१३ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं. सात वर्षांच्या संसारानंतर २०२१मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विवियनने दुसरं लग्न केलं.

लग्न, सात वर्षांचा संसार, घटस्फोट अन्…; वर्षभरापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्या गुपचूप उरकलं दुसरं लग्न, मुलगी झाल्यानंतर म्हणाला, “मला आता…”

घटस्फोटानंतर विवियनने इजिप्तची पत्रकार नूरन अलीशी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना एक मुलगीही आहे. याबाबत विवियनने खुलासा केला आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “हो मी लग्न केलं आहे आणि मला चार महिन्यांची मुलगीही आहे. योग्य वेळ येईल तेव्हाच मी मुलगी आणि लग्नाबाबत सांगेन असं ठरवलं होतं. वर्षभरापूर्वी मी आणि नूरनने इजिप्तमध्ये लग्न केलं”.

आपण इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासाही विवियनने केला आहे. २०१९ पासून आपण इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचे विवियनने सांगितले आहे. विवियन म्हणाला, “माझ्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आणि आता मी इस्लामचे पालन करतो. २०१९ सालापासूनच मी रमजान महिन्यापासून इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली. दिवसातून ५ वेळा प्रार्थना केल्याने मला खूप चांगलं वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडेच विवियनने इंस्टाग्राम स्टोरीवर तो रमजान साजरा करणार असल्याचा खुलासा केला होता, त्यानंतर याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. पण, एका मुलाखतीत त्याने इस्लाम धर्म स्वीकारल्याचं मान्य केलं आहे.