‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष मधुराणी प्रभुलकर अरुंधती म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मधुराणीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ती आज अनेक महिलांची आयडॉल झाली आहे.

हेही वाचा – “चौकातल्या पोराला फिल्मफेअर”, प्रवीण तरडेंची खास पोस्ट पाहून देवेंद्र गायकवाड भावुक, म्हणाले, “पदोपदी…”

What Devendra Fadnavis Said About Dombivali Blast?
Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले, “घटना…”
Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
Suchitra Pillai on being called boyfriend snatcher
“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
aajji bai jorat marathi play for kids based on artificial intelligence
आज्जीबाई जोरात
Google Doodle Hamida Banu First women Wrestler
“मला हरव, तुझ्याशी लग्न करेन”, म्हणणारी १०८ किलोची ‘सिंहीण’; गूगल डूडलवर झळकणाऱ्या बानूची पडद्यामागची गोष्ट!
chhagan bhujbal uddhav thackeray narendra modi
उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे खुले? पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “राजकारणात आजचा शत्रू…”
Marathi actor prasad oak why not Working In Hindi Movie
“मला उत्तम मान अन् पैसे…”, प्रसाद ओकने हिंदीत काम न करण्यामागचं कारण केलं स्पष्ट, म्हणाला…

२०१९ पासून सुरू झालेल्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधतीचा नवा प्रवास सुरू आहे. अशातच नुकतीच अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर ‘मिरची मराठी’च्या ‘गप्पांची मिसळ’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला विचारलं गेलं की, अरुंधतीच्या भूमिकेने तुला कोणत्या गोष्टी नव्याने शोधायला भाग पाडलं. यावर मधुराणी म्हणाली, “मी सलग चार-सव्वा चार वर्ष रोज १३ तास काम करून शकेन, एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे हा माझा मला शोध लागला. मी खूप अशी मुलगी आहे की, चोखंदळचं काम करेल आणि मी तशीच होते. कारण मालिका करायला भावनिक, मानसिक, शारिरीक ताकद लागते.”

हेही वाचा – Video: “साडी नेसून कॉमेडी करायची काय गरज?” भाऊ कदम आणि ओंकार भोजनेला साडीत पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया, म्हणाले…

“चित्रपट करताना तुम्हाला माहित असतं की, मला इथे तणमन सगळं अर्पण करायचं आहे. पण हे काही दिवसांनी संपणार आहे. मालिका सातत्याने सुरू आहे. तसंच तुमच्या आयुष्यातही सतत काहींना काहीतरी घडतं असतं. मी असं म्हणत नाही की, घरोघरी असंच सुरू असतं. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या देखील भावनांचा चढ-उतार होतं असतो. त्यात तुम्हाला रोज उठून त्याचं तन्मयतेने काम करायचं आहे. आपण एवढ्या जणांच्या, जणींच्या मनात घर करू शकतो. आपला अभिनय इतक्या जणांचं आयुष्य बदल शकतो याचा नव्याने मला शोध लागला, असं मला वाटतं,” असं मधुराणी म्हणाली.