‘बिग बॉस ओटीटी २’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमधील स्पर्धकांची एकमेकांशी भांडणं आणि गप्पा, वैयक्तिक आयुष्याबद्दलचे खुलासे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अशातच एका टास्कमध्ये जैद हदीद आणि आकांक्षा पुरीने एकमेकांना लिपलॉक किस केलं. दोघांच्या किसचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जैद हदीदची चर्चा होताना दिसत आहे.

Video: एकमेकांच्या जवळ गेले अन्…; ‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी सर्वांसमोर एकमेकांना केलं लिपलॉक किस

मॉडेल जैद हदीदने त्याची मुलगी आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रमोना खलीलबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. जैदने २०१७ मध्ये रमोना खलीलशी लग्न केलं होतं. ती एक मॉडेल व उद्योजक आहे. गो लाइट गॉरमेट, डिटॉक्स आणि हेल्दी मिल्स डिलिव्हरी सर्व्हिसेसची ती मालकीण आहे. जैद व रमोलाला २०१९ मध्ये मुलगी झाली, तिचं नाव कॅटलेया आहे. मुलीच्या जन्मानंतर काही काळातच ते वेगळे झाले, पण दोघेही मिळून मुलीचा सांभाळ करतात. पूर्व पत्नीशी चांगलं नातं असून तिच्याबद्दल आदर असल्याचं जैदने सांगितलं होतं.

पहिल्या डेटवर कधी सेक्स केला आहे का? तमन्ना भाटिया व विजय वर्मा म्हणाले…

“मी घटस्फोटित आहे आणि मला एक मुलगी आहे. लोकांना माझ्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात, पण त्यांना तिची आई कधीच दिसत नाही. ते अनेकदा विचारतात की तिची आई कुठे आहे, तू तिला का लपवत आहेस. खरं तर मी तिच्या आईला लपवत नाही, आमचा घटस्फोट झाला आहे. पण मला तिच्या आईबद्दल खूप आदर आहे,” असं त्याने ‘इ-टाइम्स’ला सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जैद हदीद व आकांक्षा पुरी यांचा ‘बिग बॉस ओटीटी २’ मधील किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्पर्धक अविनाश सचदेव याने जैद आणि आकांक्षाला किस करण्याचे टास्क दिले होते. दोघांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ते ३० सेकंद एकमेकांना किस करत होते.