Tanusha Sharma Committed Suicide: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

‘फ्री प्रेस जर्नल’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली. सहकलाकार व कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानच्या त्रासाला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान खान चर्चेत आला आहे.

हेही वाचा>>“…ते कधीच थांबत नाहीत”; तुनिषा शर्माने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेला सेटवरील व्हिडीओ

शिझान ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिषाचा सहकलाकार आहे. या मालिकेत तो अलिबाबा या मुख्य भूमिकेत होता. शिझान व तुनिषाचे ऑफ सेट संबंधही चांगले असल्याचं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन समजतं. तुनिषाने तिच्या इन्स्टाग्रामवर शिझानबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जागतिक पुरुष दिनाच्या दिवशीही तिने शिझानसाठी खास पोस्ट लिहिली होती. तुनिषा व शिझान एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या.

हेही वाचा>> “आई-वडिलांचा विचार येत नाही का?”, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट

हेही पाहा>> Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुनिषाप्रमाणेच शिझानही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरली होती. ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेआधी तो जोधा अकबार मालिकेत झळकला होता. प्रसिद्ध अभिनेत्री फलक नाझचा तो छोटा भाऊ आहे. तुनिषाने शिझान खानच्याच मेकअप रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.