गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच बंद होणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली ‘आई कुठे काय करते’ सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर आलिशान गाडी खरेदी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पण, रुपालीने ही आलिशान गाडी स्वतःसाठी नाही तर एका व्यक्तीसाठी घेतली आहे.

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना अभिनेत्री रुपाली भोसलेने आलिशान गाडी घेण्यामागचा हेतू सांगितला. ती म्हणाली, “बकेट लिस्टमध्ये अजून बरंच काही आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बकेट लिस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये एक-एक गोष्टी टिक करण्यासाठी ती मेहनत आणि धडपड सुरू राहणार आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनामुळे ‘या’ चार सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार, नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये नेमकं काय झालं? वाचा…

पुढे रुपाली भोसले म्हणाली की, संकेतचं खूप दिवसांपासून आणि वर्षांपासून स्वप्न होतं. नोकरी करून कधी कंटाळा येतो. तसंच अनेकदा जेवढं काम करतो तेवढे पैसे मिळत नाहीत किंवा प्रगती होतं नाही. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्यासाठी गाडी घेतली आहे. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून गाडी घेतली आहे.”

“ती गाडी माझी नसून संकेतची गाडी आहे. त्याच्यासाठी घेतली आहे. त्याच्या स्वप्नांना वेग मिळावा, या माध्यमातून त्याने त्याचं ध्येय गाठावं, यासाठी गाडी घेतली आहे. मी फक्त मदत करते. मी नेहमी आई-बाबा,संकेतच्या पाठिशी उभी असते. तसंच काहीस मी केलं आहे,” असं रुपालीने सांगितले. संकेत हा रुपालीचा सख्खा भाऊ आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरसाठी ‘हे’ सीन होते आव्हानात्मक, म्हणाली, “अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून…”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाच जून महिन्यात अभिनेत्री रुपाली भोसलेची स्वप्नपूर्ती झाली. तिने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. या घराची वास्तुशांती तिने पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात घातली होती. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.