scorecardresearch

Premium

“…म्हणून अजूनपर्यंत मुलाला सोशल मीडियापासून ठेवलंय लांब”, शशांक केतकरने सांगितलं कारण, म्हणाला, “ऋग्वेद…”

फक्त सोशल मीडियापासून नाहीतर ‘या’ गोष्टींपासून शशांकच्या लेकाला ठेवलंय लांब

why not reveal shashank ketkar his son face on social media
फक्त सोशल मीडियापासून नाहीतर 'या' गोष्टींपासून शशांकच्या लेकाला ठेवलंय लांब

‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. या मालिकेत त्याने साकारलेला अक्षय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अशातच शशांक आपल्या मुलाला सगळ्यांसमोर का आणत नाही? याविषयी त्याने भाष्य केलं आहे.

नुकताच अभिनेता शशांक केतकरने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर खेळ खेळण्यात आला. तेव्हा शशांकने लेक ऋग्वेदविषयी सांगितलं. तसंच अजूनपर्यंत लेकाला सोशल मीडियापासून लांब का ठेवलंय? याविषयी अभिनेता स्पष्टच बोलला.

Does leaving gluten help prevent gas and bloating Experts weigh in
ग्लुटेनयुक्त आहार टाळल्यास गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होईल का? काय आहे तज्ज्ञांचे मत…
memory
तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी वारंवार विसरता? विसरण्याची सवय सामान्य आहे की गंभीर? वाचा सविस्तर…
Surya Rashi Parivartan 2024
उद्यापासून ‘या’ ४ राशींच्या हातात येईल चांगला पैसा? शनिदेवाच्या राशीत सूर्यदेव गोचर करताच होऊ शकतात मालामाल
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

हेही वाचा – Video: मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाने शाहरुख खानला अडवलं अन् मग…; बादशाहच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष

रॅपिड फायरच्या खेळात शशांकला विचारलं गेलं की, आयुष्यातला कोणता दिवस आहे जो फ्रेम करून ठेवायला कायमचा आवडेल? यावर अभिनेता म्हणाला, “२१ डिसेंबर २०२०, ज्या दिवशी माझा मुलगा ऋग्वेदचा जन्म झाला. तो दिवस कायमच मी फ्रेम करून ठेवेन. कारण जन्मतारीख पण थोडी युनिक आहे २१-१२-२०. त्याच्या जन्मासाठी ग्रहांची स्थिती वगैरे इतकं छान जुळणं आलेलं. खरंच तो युनिक दिवस होता. अर्थात कोणत्याही नव्या माणसाचं आपल्या आयुष्यात आगमन होतंय आणि ते आपलं आहे, ही भावनाच काही वेगळी आहे.”

यानंतर शशांकला विचारलं जात की, ऋग्वेदला सगळ्यांसमोर कधी आणणार आहेस? तेव्हा शशांक स्पष्ट नाही म्हणत बोलतो की, इतक्याच नक्कीच आणणार नाहीये. कारण आम्ही त्याला फक्त सोशल मीडियापासूनच लांब नाही ठेवलंय तर आम्ही त्याला मोबाइल, टीव्हीपासून सुद्धा लांब ठेवलंय. म्हणजे दिवसातून आम्ही त्याला काही मिनिटांच्या वर स्क्रीन दाखवत नाही. नशीबाने त्याला पुस्तकांचं भयंकर वेड लागलं आहे. तो तीन वर्षांचा व्हायचा आहे, पण त्याला सगळी अक्षरं कळतात. सगळे देव पाठ आहेत. सगळ्या आरत्या पाठ आहेत. हे सगळं प्रियांका करून घेतेय. दोन्हीकडचे आजी-आजोबा करून घेतायत. म्हणून हे सगळं शक्य होतं. नाहीतर तो अन्यथा इतर मुलांसारखाच मोबाइलमध्ये अडकला असता. त्यामुळे आमचा हा निर्णय आहे, आता त्याला सोशल मीडियाच्या जगात आणायचं नाहीये.

हेही वाचा – “पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”, नीना गुप्ता यांच्या ‘फालतू फेमिनिझम’ विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

पुढे शशांक म्हणाला,”मी ऋग्वेदसाठी आलेल्या अनेक जाहिरातींना पण नकार दिला. तेलाच्या, पावडरच्या, पुस्तकांच्या, डायपरच्या अशा जाहिराती आल्या होत्या. पण आम्ही नाही म्हणालो. कारण ते लहान मुलं कपडे न घातलेलं दाखवायचं आणि त्याच्यातून आम्ही पैसे कमावयाचे, ही भावना आम्हाला काही पटली नाही. हा आमचा विचार आहे. तो खूप मोठा झाला, त्याला कळायला लागलं तर तो समोर येईलचं.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why not reveal shashank ketkar his son face on social media pps

First published on: 01-12-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×