काही मालिका वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या झालेल्या असतात. त्यापैकी एक मालिका म्हणजे शिवा (Shiva) ही आहे. आता ‘झी मराठी’ने या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शिवाने सीताईंना आदर्श सून होण्याचे वचन दिल्याचे दिसत आहे.

शिवाची द्विधा मन:स्थिती

प्रोमोच्या सुरुवातीला शिवा सीताईला म्हणते, “सीताई, ही शिवा तुम्हाला वचन देते. तुम्हाला हवी तशी सून होऊन दाखवेन. अगदी संस्कारी सून असते तशी.” त्यावेळी सीताई तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघताना दिसत आहे. त्यानंतर त्या दोघी बाजारात खरेदी करायला गेल्या असून, काही गुंड विक्रेत्यांकडे हप्ता मागत असल्याचे दिसते. एक गुंड एका विक्रेत्या महिलेला म्हणतो, “चल ए काकी, चल हप्ता काढ. त्यावेळी त्याला धडा शिकविण्यासाठी मारहाण करताना दिसत आहे. मात्र, ज्यावेळी सीताई तिला हाक मारते, त्यावेळी त्यांना ती नारळ दाखवते. सीताई तिला, आपल्याला नको असे म्हणते. पुढे गेल्यावर दुसरा गुंड तिला मारायला येतो. त्याच्याशी दोन हात करताना तिच्या हातात फुलांची पाटी आहे आणि त्याच वेळी सीताई तिला शिवा म्हणून हाक मारते. त्यावेळी शिवाच्या चेहऱ्यावर भीती असल्याचे दिसत आहे.”

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, “शिवा जिंकू शकेल का सीताईचं मन…?” अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांच्या नातीची गगनभरारी! भारतातील सर्वोच्च संस्थेत शिक्षणासाठी मिळवला प्रवेश, फोटो पोस्ट करत म्हणाली…

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवा आणि आशुतोष यांचे लग्न सीताईला मान्य नाही. त्यामुळे शिवाने आशुतोषच्या आयुष्यातून लवकरात लवकर निघून जावे यासाठी सीताई प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी तिने शिवाकडून घटस्फोटाच्या पेपरवर सह्यादेखील घेतल्या आहेत. मात्र, शिवाने सहा महिन्यांत सीताईसह घरातील इतरांची मनेदेखील जिंकून दाखवेन, असे सीताईला म्हटले आहे.

आता शिवा सीताईचे मन जिंकण्यात यशस्वी होणार का? आशुतोष आणि शिवाची मैत्री तशीच राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता मालिकेत पुढे काय होणार, कोणते नवीन वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.