कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या जोरदार गाजतंय. टिव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त शो अशी ओळख असलेल्या बिग बॉस मराठी मध्ये यंदा अपूर्वा नेळेकर, अक्षय केळकर, किरण माने, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे असे प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले आहेत आणि दरवर्षी प्रमाणे यावेळीही बिग बॉसच्या घरात तुफान राडे, भांडण, वाद पाहायला मिळत आहे. शोच्या सुरुवातीलाच पडलेल्या दोन टीममध्ये रोज काही ना काही वाद होताना दिसत आहेत. पण नुकत्याच आठवड्याअखेर झालेल्या एलिमिनेशनने घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला आहे. या आठवड्यात ‘टुक टुक राणी’ म्हणजेच यशश्री मसुरकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.

बिग बॉस मध्ये दर आठवड्याला एका सदस्याचं एलिमिनेशन होतं म्हणजेच एक सदस्य घरातून बाहेर पडतो. पण या आठवड्यात मात्र एकाच वेळी दोन एलिमिनेशन करत बिग बॉसने सर्वच सदस्यांना धक्का दिला. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात यशश्री मसुरकरने निरोप घेतला. तब्बल ४९ दिवसांनंतर यशश्रीचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यशश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आणखी वाचा- Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

यशश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या ऑटो रिक्षाबरोबरचा एका फोटो शेअर केला आहे. या रिक्षाबद्दल यशश्रीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर सर्वांना सांगितलं होतं. यशश्री स्वतः तिची रिक्षा चालवते आणि या रिक्षातून ती संपूर्ण भारतभर प्रवास करते असंही तिने बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सांगितलं होतं. आपल्या आवडत्या रिक्षाबरोबरचा फोटो शेअर करताना यशश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “काहीही झालं तरी मी खरं बोलते आणि सत्याची कास कधीच सोडत नाही, सत्य शोधण्याचा प्रयत्न करते.” यशश्रीच्या या पोस्टला तिच्या बिग बॉस प्रवासाशी जोडलं जात आहे.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4: किरण माने घराबाहेर, पण खेळाबाहेर नाही! बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशश्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिच्या बिग बॉस शोमधील प्रवासाबद्दल कौतुक केलं आहे. अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या आठवड्यात महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या चावडीवर संपूर्ण आठवड्याचा आढावा घेत. घरातील सदस्यांना खासकरून अमृता धोंगडेला चांगलंच सुनावलं. याशिवाय संपूर्ण आठवड्यातील टास्क, वाद, भांडणं यांचा हिशोब महेश मांजरेकर यांनी घेतला. यशश्री मसुरकर घरातून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या एलिमिनेशनची वेळ आली तेव्हा महेश मांजरेकर स्वतः बिग बॉसच्या घरात आले आणि त्यांनी किरण माने यांना घरातून बाहेर पडावं लागेल असं सांगितलं.