‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री हिना खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हिनाची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट देखील चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अभिनेत्री हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती शरीराचे तापमान तपासणारे थर्मामीटर दाखवत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिल आहे, “मागील तीन-चार रात्र खूप भयंकर होत्या. मला खूप ताप असून माझ्या शरीराचे तापमान १०२-१०३च्या जवळपास आहे. जे माझी काळजी करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की, माझी काळजी करू नका. मी लवकरच बरी होऊन परत येईन. माझ्यावर असंच प्रेम करत राहा.”

हेही वाचा – लग्नानंतर गौतमी देशपांडे नवऱ्यासह पोहोचली कोकणात, मराठी सोशल मीडिया स्टारने शेअर केले फोटो

तसेच दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री रुग्णालयाच्या बेडवर बसलेली पाहायला मिळत आहे. या फोटोवर हिनाने लिहिल आहे, “लाइफ अपडेट, चौथा दिवस.”

हेही वाचा – गौतमी देशपांडे आणि स्वानंदी टिकेकरनंतर ‘ही’ मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून हिना ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय अनेकांना चांगलाच पसंतीस पडला आहे. ६ ऑक्टोबरला हिनाचा हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.