Zee Chitra Gaurav 2025 Winners List : ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष होतं. यानिमित्ताने या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन व सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे, मृणाल कुलकर्णी, महेश मांजरेकर, भरत जाधव असे सगळे दिग्गज कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यात अनेक परफॉर्मन्स, विनोदी स्किट्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

यंदा ‘झी चित्र गौरव’ पुरस्काराचं सूत्रसंचालन रितेश देशमुख व अमेय वाघ यांनी केलं. या सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुखसाठी खास पत्रवाचन करण्यात आलं. हे पत्रवाचन ऐकल्यावर रितेश वडिलांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय श्रेयस तळपदेने प्रेक्षकांच्या आग्रहास्तव खास ‘पुष्पा २’ चित्रपटातले संवाद देखील म्हणून दाखवले.

‘झी चित्र गौरव’ पुरस्कारांमध्ये गतवर्षी मराठी मनोरंजन विश्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. श्रेयस तळपदेचा ‘पुष्पा’ सिनेमाच्या डबिंगसाठी तर, छाया कदम यांचा मनोरंजन विश्वातील योगदानासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय या सोहळ्यात आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’ चित्रपटाने देखील बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Zee Chitra Gaurav 2025 – ‘झी चित्र गौरव’ पुरस्कारांमध्ये विजयी ठरले ‘हे’ कलाकार…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – पाणी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – महेश मांजरेकर ( जुनं फर्निचर )
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – वैदेही परशुरामी ( एक, दोन, तीन चार )
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आदिनाथ कोठारे ( पाणी )
  • सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – वैदेही परशुरामी व निपुण धर्माधिकारी
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – मकरंद अनासपुरे ( नवरदेव BSC एग्री )
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – नम्रता संभेराव ( नाच गं घुमा )
  • सर्वोत्कृष्ट गीतकार – आदित्यनाथ कोठारे व मनोज यादव ( पाणी )
  • विशेष योगदान पुरस्कार – छाया कदम
  • विशेष योगदान पुरस्कार -श्रेयस तळपदे
  • ब्लॉकबस्टर चित्रपट २०२५ – नवरा माझा नवसाचा २
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – क्षितीश दाते ( धर्मवीर २)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अश्विनी भावे ( घरत गणपती )
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – मायरा वायकुळ ( नाच गं घुमा )
  • मराठी पाऊल पडते पुढे – दिग्दर्शक आदित्य सरपोतदार
  • मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द ईयर -प्राजक्ता माळी
  • सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – सुहास देसले ( अमलताश )
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा – महेश बराटे ( फुलवंती )
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे ( फुलवंती )
  • सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – डॉ. सुमित पाटील ( घरत गणपती )
  • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – उमेश जाधव ( फुलवंती )
  • सर्वोत्कृष्ट संकलन – सुहास देसले ( अमलताश )
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – महेश लिमये ( फुलवंती )
  • सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण – अनमोल भावे ( पाणी )
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अमोल धडफळे, भूषण माटे, जॉन मॅथ्यू ( अमलताश )
  • सर्वोत्कृष्ट कथा – सुहास देसले ( अमलताश )
  • सर्वोत्कृष्ट पटकथा – नितीन दीक्षित ( पाणी )
  • सर्वोत्कृष्ट संवाद – महेश मांजरेकर ( जुनं फर्निचर )
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – गुलराज सिंग ( पाणी )
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन – राहुल देशपांडे ( अमलताश )
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – वैशाली माडे ( फुलवंती )

दरम्यान, सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अमेय वाघ व रितेश देशमुख यांच्या निवेदनाने या सोहळ्याची सांगता झाली.