अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस पडली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. याशिवाय मालिकेतील कलाकारांनी स्वतःची पात्र उत्तमरित्या साकारली होती. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक त्यांच्या पात्रांवरून ओळखत आहेत.

नुकताच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला. या खास क्षणाच जंगी सेलिब्रेशन मालिकेच्या टीमकडून करण्यात आलं. यावेळी दोन मोठे केक कापून मालिकेच्या टीमने हा खास क्षण साजरा केला. यावेळी सगळ्या टीमला खास भेटवस्तू देण्यात आली. याशिवाय तुषार देवलने मालिकेचं शीर्षक गीत गायलं. पण सेलिब्रेशनच्या केकवर देवीचा फोटो होता. हा फोटो पाहून एका युजरने आक्षेप घेतला. पण त्यावर ‘झी मराठी’ वाहिनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने मालिकेतील चिमुकल्या जानकीचा गोड व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “ही सेटवर आली की…”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या सेलिब्रेशनचे फोटो ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले होते. त्याच पोस्टवर एका युजरने लिहिलं की, देवीचा फोटो असलेला केक कापणार का? यावर ‘झी मराठी’ वाहिनीकडून स्पष्टीकरण देत सांगण्यात आलं, “केकचा तो भाग बाजूला काढून ठेवला होता. त्रिनयना देवी या मालिकेचा मूळ गाभा आहे. हे रहस्य तिने योजलेलं आहे. त्यामुळे सगळ्या क्रिएटीव्हवर तिची प्रतिमा असतेच.”

हेही वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा, कलाकारांनी ‘असा’ साजरा केला खास क्षण

दरम्यान, सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली. अजूनही या मालिकेवर प्रेक्षक तितकंच भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेचं रहस्यमय कथानक असल्यामुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे.