‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. पण नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘पारु’ या नव्या मालिकेचा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

१६ डिसेंबरला ‘पारु’ मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मनसोक्त हसणारी ‘पारु’ नेमकी कोण असणार? हे जाहीर करण्यात आलं होतं. काल मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ज्यामधून मालिका नेमकी काय असणार? हे दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा – Video: अंकिता लोखंडे नात्यातून ब्रेक घेण्याचा करतेय विचार! पती विक्की जैनला म्हणाली…

नव्या प्रोमोमध्ये, अहिल्यादेवी किर्लोस्कर नावाच्या व्यक्तीचं राज्य पाहायला मिळत आहे. तिला दोन मुलं आहेत. एक मुलगा कामात दंग, तर दुसऱ्याला ऐयाशीचा संग. शिस्तबद्ध, वचनाची पक्की असणाऱ्या या अहिल्यादेवीच्या जगात मनसोक्त जगणाऱ्या पारुची एन्ट्री होणार आणि मग काय घडणार? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘पारु’ या नव्या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणेसह अभिनेता प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मुग्धा अहिल्यादेवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून प्रसाद अहिल्यादेवीच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, कथित गर्लफ्रेंड सुहाना खानने केलं फॉलो, तर गौरी खानने…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ आता ऑफ एअर होणार आहे. १३ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. याआधी ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.