छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांना सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रहस्यमय कथानकामुळे ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेत आता लवकरच पंचपिटिका रहस्याचा जन्म होणार आहे.

पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला घरातच राहायला देतात. तिला बेघर होऊ देत नाहीत. राजाध्यक्षांनी आसरा दिल्यानंतरही काही काळ इंद्राणीला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, पुढे एके दिवशी इंद्राणी द्विधा मनस्थितीत असताना तिला साधू भेटतात. हे साधू तिला लहानपणीदेखील भेटलेले असतात. त्रिनयना देवीने तुझ्यावर नेत्राला वाचवण्याची जबाबदारी सोपवली आहे अशी माहिती हे साधू इंद्राणीला देतात.

हेही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर आलिया भट्टने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

आतापर्यंत या मालिकेत प्रेक्षकांनी नेत्राने आपल्या वरदानाचा उपयोग करून अद्वैतचा मृत्यूयोग टाळल्याचं पाहिलं आहे. परंतु, अद्वैतच्या रक्षणासाठी नेत्राने त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या स्त्रियांसाठीचे काही नियम नेत्राने मोडले आहेत.

हेही वाचा : “मी २२ मालिका नाकारल्या, कारण…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला “चित्रपट मिळाले पण…”

एके दिवशी नेत्राच्या नाकातून रक्त येऊ लागतं. आता कदाचित याच कारणामुळे नेत्राचे मृत्यू होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इंद्राणी नेत्राला सांगते की, तिने त्रिनयना देवी ग्रंथ वाचला तर काहीतरी मार्ग सापडेल. पण त्याचवेळी भालबा येऊन सांगतात, की त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा मंदिरात ठेवला, तर नेत्राचा मृत्यूयोग कदाचित टळू शकतो. भालबा नेत्राला सूचना देतात की ग्रंथ मंदिरात ठेवण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पानावर हळदीकुंकू लाव आणि देवीचा मंत्र म्हण.

हेही वाचा : ‘टायगर ३’च्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित; तब्बल १० वर्षांनी अरिजीत सिंहने गायले सलमानसाठी पहिले गाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भालबांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा ग्रंथाला हळदीकुंकू लावत असताना ग्रंथावर तिच्या डोळ्यातील अश्रू पडतात आणि त्यातून पंचपिटिका हा शब्द उमटतो. त्याच पानाला पुन्हा कुंकू आणि पाणी लावल्यावर एक श्लोक मोडी लिपिमध्ये लिहिलेला दिसतो. काय असेल हे पंचपिटिका रहस्य, त्याचा शोध नेत्रा कसा घेणार… याचा उलगडा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील आगामी भागांमध्ये करण्यात येणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.