कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. काही कलाकार मंडळी आपल्या रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य करताना दिसतात. तर काही मंडळी आपल्या नात्याबाबत न बोलणंच पसंत करतात. मात्र कलाकारांचं रिलेशनशिप कोणापासून लपून राहिलेलं नाही. असंच काहीसं झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमधील अजिंक्य ननावरे याच्याबाबतही घडलं.

आणखी वाचा – Video : जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचा लेक डायबिटीजचा अर्थ सांगतो तेव्हा…; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

अजिंक्य या मालिकेमध्ये अद्वैत हे पात्र साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अद्वैत त्याच्या कामाबरोबरच लव्ह लाइफमुळेही चर्चेत राहिला आहे. अजिंक्य गेले काही वर्ष अभिनेत्री शिवानी सुर्वेला डेट करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये शिवानीने सहभाग घेतला होता.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

‘बिग बॉस मराठी’मध्येच असतानाच तिने आपल्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. शिवानी व अजिंक्यने कपल टॅटूही काढला आहे. शिवानी १९ तर अजिंक्य २२ वर्षांचे असताना एकमेकांना ओळखत आहेत. शिवानीने आजवर मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. ती लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटातही काम करतना दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्य़वसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

तर अजिंक्यही एक उत्तम अभिनेता आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सख्या रे’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालितकांमध्ये अजिंक्यने काम केलं आहे. शिवानी आणि अंजिक्यने ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. दरम्यान त्या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आणि त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.