‘झी मराठी’वरील अनेक मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेली ‘लोकमान्य’ आणि ‘लवंगी मिरची’ या दोन मालिका टीआरपीच्या अभावी नुकत्याच बंद केल्या गेल्या. तर त्या पाठोपाठ आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये झी मराठीवर ‘यशोदा: गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून दुपारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेला काही दिवसांतच संध्याकाळचा टाइम स्लॉट मिळाला. परंतु सहा महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला आहे.

हेही वाचा : Video: “एकाही पैशाचा मोबदला न घेता त्यांनी…”, ‘लोकमान्य’ मालिका संपताच स्पृहा जोशीने सांगितली पडद्यामागची गोष्ट

नुकताच या मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. या वेळेचा एक फोटो या मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मालिकेच्या टीमचा हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “चित्रीकरणाचा शेवटचा दिवस. यशोदा. छोटा तरी पण मोठा प्रवास.” पण ही मालिका नक्की कोणत्या कारणाने थांबवली जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आणखी वाचा : Video: आर्या आंबेकरपाठोपाठ रोहित राऊतही करणार अभिनयात पदार्पण, प्रोमो समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरेंद्र प्रधान यांची ही पोस्ट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर आता त्या पोस्टवर कमेंट करत या मालिकेचे प्रेक्षक हळहळ व्यक्त करत आहेत.