शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना एक विधान केलं. केवळ टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही अशी संभाजी भिडे यांची भूमिका होती. त्यांच्या या विधानानंतर टिकली वाद चांगलाच रंगला. कलाक्षेत्रातील विविध मंडळींनीही यावर सोशल मीडियाद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे. आता झी मराठी वाहिनीने याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – ३३ कोटी देव म्हणजे नेमकं काय? शरद पोंक्षेंनी व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाले, “किती हिंदूंना…”

झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमादरम्यानचाच एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. एका विनोदी स्किटदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये टिकलीबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

स्किट सादर करणारी अभिनेत्री आपल्या नवऱ्याला म्हणते, “मी म्हणजे बाई ना… टिकली लावायची की नाही लावायची हे बाईला ठरवू द्या. आणि दुसरं तुम्ही काय बोललात अगदी वेड्यासारखं की टिकली म्हणजे नवरा जिवंत असल्याचं प्रतिक. मग मी बाई आरशाला टिकली लावून आंघोळीला जाते तेवढ्या वेळात तुम्ही आरश्याला येऊन चिकटता का? इतकंच काय मेकअप करताना मी कितीवेळ बिना टिकलीची असते. तेवढ्या वेळात कोमात जाता की काय? अहो असं काय करता आपलं हे नातं प्रेमावर टिकलं आहे टिकलीवर नाही.”

आणखी वाचा – आठ वर्षांचं रिलेशनशिप, लग्न अन् काही महिन्यांतच घटस्फोट, आता दुसऱ्या लग्नासाठी अपूर्वा नेमळेकर तयार? म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झी मराठी वाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. हिंदु असल्याचा अभिमान बाळगा, आपल्याच धर्माची खिल्ली उडवणे म्हणजे भविष्य धोक्यात आहे, आम्ही हिंदू मुली आहोत आणि टिकली म्हणजे आमचा स्वाभिमान आहे, हिंदु धर्माचा अपमान होत आहे अशा अनेक कमेंट हा व्हि़डीओ पाहून प्रेक्षकांनी केल्या आहेत.