सध्या बॉलिवूड व दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकार एकत्र काम करताना दिसून येतात. बॉलिवूडचे अनेक कलाकार आता दाक्षिणात्य चित्रपटात दिसून येत आहेत. बॉलिवूडचे अजय देवगण, सलमान खान दक्षिणेत तर दुसरीकडे कमल हासन, विजय देवरकोंडासारखे दाक्षिणात्य कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये दिसून येत आहेत. ३० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या दसरा या दाक्षिणात्य चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात सुपरस्टार नानी मुख्य भूमिकेत दिसत आहे.

‘अष्ट चम्मा’, ‘सवारी’, ‘भीमिली कबड्डी जट्टू’, ‘अला मोदालैंदी’, ‘पिला जमींदार’, ‘ईगा’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा नानी आता दसरा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्याने नुकतेच बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकाबद्दल भाष्य केलं आहे. एआयएनएसशी बोलताना तो असं म्हणाला, “मला दीपिका पदुकोणबरोबर काम करायला आवडेल. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मला जर संधी मिळाली आणि जर चांगली कथा असेल तर मला तिच्याबरोबर काम करायचं आहे.”

अजयच्या ‘भोला’ला दाक्षिणात्य चित्रपट ‘दसरा’देणार टक्कर; प्रदर्शित होण्याआधीच केला ‘हा’ विक्रम

तो पुढे म्हणाला, “मला बॉलिवूडच्या एक दिग्दर्शकाबरोबर काम करायचं आहे तो दिग्दर्शक म्हणजे राजकुमार हिरानी, मी त्यांच्या चित्रपटाचा चाहता आहे. बॉलिवूडच्या आवडत्या अभिनेत्याच्याबाबतीत तो असं म्हणाला, माझी इच्छा आहे की मला आमिर खान सरांबरोबर काम करायचं आहे. मला त्यांचे चित्रपट बघून आनंद होतो. तसेच मी अजय देवगण यांचा ‘भोला’देखील बघणार आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nani (@nameisnani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘दसरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं असून नानीच्या बरोबरीने कीर्ती सुरेश, संतोष नारायण हे अभिनेतेदेखील दिसणार आहेत. नानीच्या करियरमधला सर्वात हिट चित्रपट हा ठरू शकतो.