तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर याचं करोनामुळे निधन झालंय. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते करोनाशी झुंज देत होते. अभिनेता सोनू सूद शिवा शंकर यांच्या उपचारासाठी मदत करत होता. शिवा शंकर यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी आणि फिल्ममेकर्सनी शोक व्यक्त केला आहे. तर अभिनेता सोनू सूदने देखील शिवा शंकर यांचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

करोनाची लागण झाल्यानंतर शिवा शंकर यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांच्या मुलालादेखील करोनाची लागण झाली होती. शिवा शंकर यांच्या निधनानंतर सोनू सूदने एक ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. “शिवाशंकर मास्टरजींच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावून गेलंय. त्यांना वाचवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला पण देवाची इच्छा वेगळीच होती. मास्टरजी तुम्ही कायम स्मरणात रहाल. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो.” अशा आशयाची पोस्ट सोनूने शेअर केली आहे.

तर तेलगू दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी देखील एक ट्वीट करत शोक व्यक्त केलाय. ‘ लोकप्रिय कोरिओग्राफर शिवा शंकर मास्टर यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. त्यांच्यासोबत मगधीरामध्ये काम करण्याचा अनुभव कायम लक्षात राहिल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो” असं ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


शिवा शंकर यांना करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अभिनेता सोनू सूदसोबतच अभिनेचा धनुषदेखील त्यांच्या मदतीसाठी पुढे आला होता.