आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या या सीरिजचे लेखन स्वतः आर्यन खानने केले आहे आणि त्यात अनेक मोठे सुपरस्टार, तसेच काही नवीन कलाकार आहेत. या वेब सीरिजमधील एका अभिनेत्याने चित्रपट उद्योगात स्वतःचे नाव कमावण्यासाठी नोकरी सोडली.
रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनेल पॉडकास्टमध्ये, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’चा मुख्य अभिनेता लक्ष्य लालवाणीने खुलासा केला की, त्याचे वडील रोमेश लालवाणी यांनी एकदा त्याला समजावून सांगितले होते की, तो एका दिवसात जे काही कमावतो, ते त्यांच्या मासिक पगाराइतके आहे. करण जोहरच्या ‘किल’ चित्रपटानंतर प्रसिद्धी मिळवणाऱ्या लक्ष्यने पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, निर्माता रमेश तुरानीने एकदा त्याला विचारले होते, “लक्ष्य, महिन्याला ३० लाख रुपये पगार देणारी नोकरी सोडण्याचे धाडस तू कसे केलेस?”
लक्ष्य म्हणाला, “मला माहीत नाही. टीव्ही सिस्टीम दररोजच्या आधारावर काम करते. आम्हाला दररोज १५,०००, २०,००० किंवा २५,००० रुपये पगार मिळतो. त्या काळात मला चांगले पैसे दिले जात होते.” लक्ष्यने त्याचा ‘पोरस’ शो जवळजवळ संपला होता तेव्हाचा काळ आठवला. अभिनेता म्हणाला, “मी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की, ‘पोरस’ संपत आहे. मला एक नवीन शो ऑफर करण्यात आला होता आणि ते मला एका दिवसासाठी एवढी ऑफर देत होते. माझ्या वडिलांनी उत्तर दिले की, कर…, त्यात काय अडचण आहे?”
लक्ष्यने खुलासा केला की, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की, त्याला एका दिवसासाठी देत असलेली रक्कम त्यांच्या मासिक पगाराइतकी (१५,००० रुपये) आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, लक्ष्यने ‘वॉरियर हाय’, ‘अधुरी कहानी हमारी’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘परदेस में है मेरा दिल’ व ‘पोरस’सारख्या शोमध्ये काम केले आहे. त्याने ‘किल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. निखिल नागेश भट दिग्दर्शित या चित्रपटाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला.