‘द कपिल शर्मा शो’मध्ये चंदू चायवालाची भूमिका साकारणाऱ्या कॉमेडियन चंदन प्रभाकरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटोतील चंदनचा लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. चंदन आगामी एपिसोडमध्ये ‘कबीर सिंग’च्या लूकमध्ये दिसणार आहे. याच लूकमधील फोटो त्याने पोस्ट केला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कबीर सिंग’ या चित्रपटातील शाहिदचा हुबेहूब लूक या फोटोत पाहायला मिळतोय. काळा टी-शर्ट, जीन्स, दाढी, विखुरलेले केस आणि काळा चष्मा अशा संपूर्ण लूकमध्ये चंदन ‘कबीर सिंग’च वाटतोय. ‘तू ओळखूनच येत नाही आहेस’, अशी कमेंट युजर्सनी त्याच्या फोटोवर दिली आहे. त्यामुळे कपिल शर्माच्या येत्या एपिसोडमध्ये चंदनच्या भूमिकेला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चंदन प्रभाकर हा कपिल शर्माचा लहानपणीचा मित्र आहे. कपिलने जेव्हापासून त्याचा स्वत:चा कॉमेडी शो सुरू केला आहे तेव्हापासून चंदन त्याच्यासोबत काम करतोय. या कार्यक्रमाला सध्या चांगला टीआरपी मिळत असून दर आठवड्याला नवनवीन सेलिब्रिटी कार्यक्रमात हजेरी लावतात. कपिल आणि चंदनसोबतच या शो मध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kapil sharma show chandan prabhakar latest picture as kabir singh will leave you stunned ssv
First published on: 18-12-2019 at 10:45 IST