सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. तर चित्रपटातील भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार हा चर्चेचा विषय ठरला आहे. पण सगळ्यात जास्त चर्चा होते ती बिट्टा कराटेची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरची. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एका काश्मिरी पंडितानं बाळासाहेबांविषयी काय सांगितले याचा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चिन्मय याविषयी सांगताना म्हणाला, “माझा एक खूप जवळचा मित्र आहे. तो स्वत: काश्मिरी पंडित आहे. मी त्याच्या घरी राहिलो आहे तो आता दिल्लीला राहतो. त्याच्या घरी राहत असताना त्यांनी कसं रातोरात श्रीनगर काश्मिर सोडलं. त्याच्या वडिलांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंविषयी असलेला आदर ही मी पाहिलेला होता. त्यांच असं म्हणणं होतं की जेव्हा कोणीच आमच्या बाजून उभं राहिलं नाही. तेव्हा एकच नेता आमच्या बाजून उभा राहिला आणि आमच्या बाजूने बोलला.”

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
What Piyush Goyal Said?
भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’बाबत प्रश्न विचारताच पियूष गोयल यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

Oscar 2022 : “माझ्या पत्नीचे नाव …”, भडकलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन सुत्रसंचालकाच्या लगावली कानशिलात

‘द काश्मीर फाइस्ल’ या चित्रपटाचं चित्रीकरण हे मसूरी, देहरादूनमध्ये झालं आहे. संपूर्ण काश्मिरवर या चित्रपटाचं कथानक आधारित असलं तरी चित्रपटातला फक्त एकच सीन काश्मिरमधील श्रीनगरमध्ये शूट करण्यात आला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.