scorecardresearch

जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांच्या खटल्यावर आधारित ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’ चित्रपटाचा नाट्यमय ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं.

जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांच्या खटल्यावर आधारित ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’ चित्रपटाचा नाट्यमय ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं. त्यांची कोर्टातली सुनावणी ही चक्क लाईव्ह दाखवण्यात येत होती. सामान्य लोकांनी यामध्ये चांगलाच रस घेतला आणि बऱ्यापैकी लोकं ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. या सुनावणीदरम्यान दोघांनी एकमेकांवर खूप आरोप केले. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला. या नाट्यमय घटनेवर चित्रपट बनणार असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तेव्हापासूनच जगभरातील प्रेक्षकांच्या मानत या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा : “हे मला रोज…”, राखी सावंतने आदिलविषयी केला धक्कादायक खुलासा

‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’ हे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ‘टुबी’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोफत प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री मेलिसा मार्टी ही अभिनेत्री जॉनी डेपच्या वकिलाची भूमिका साकारणार असून मेरी करिग ही अँबरच्या वकिलाची भूमिका साकारणार असल्याचे या ट्रेलरमधून समोर येते. ‘टूबी’च्या अधिकृत यू ट्यूब चॅनलवर हा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

एक मिनिटाच्या या ट्रेलरची सुरुवात कोर्टाच्या सीनपासून होते. ज्यात जॉनी गॉगल घालून कोर्टात बसलेला दिसतो. कोर्टात घडलेले अनेक आरोप प्रत्यारोप या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. तर त्याबरोबरच या ट्रेलरमधये जॉनी डेप आणि अँबरचे वैवाहिक आयुष्य कसे होते याचीही झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या मानहानीचा खटला अनेक महिन्यांपासून चर्चेत राहिला. यात 7 न्यायाधीशांनी एकमताने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर अवघ्या चार वादग्रस्त हा वादग्रस्त मानहानीचा खटला मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटात २ महीने सुरू असणाऱ्या मानहानिच्या सुनावणीवरच प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा कोणत्याही कलाकाराचा बायोपिक नसून यामध्ये केवळ तथ्यांच्या आधारेच या केसबद्दल खुलासा केला जाणार आहे.

हेही वाचा : सिनेमाच घडतोय जॉनी डेपच्या आयुष्यात; अँबर हर्डशी घटस्फोटानंतर पडला वकिलाच्या प्रेमात

सारा लोहमॅन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट सामाजिकदृष्ट्या वेळेवर बनलेला एक महत्त्वाचा चित्रपट आहे, असं या चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे. जे नाट्य लोकांनी इतके दिवस चवीने पाहिलं त्याचीच पुनरावृत्ती चित्रपटाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या