अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘बागी’चा सिक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार अॅक्शन दृश्यांनी परिपूर्ण अशा ‘बागी’ सिनेमातून टायगरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या सिनेमात टायगरसोबत त्याची प्रेयसी दिशा पटानीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या पोस्टरवर टायगर श्रॉफची झलक पाहता हा चित्रपट अॅक्शनपॅक्ट असणार, यात काही शंका नाही.
…and so it begins 🙂 #Baaghi2 @khan_ahmedasas @NGEMovies @DishPatani @WardaNadiadwala @shairaahmedkhan #SajidNadiadwala pic.twitter.com/VHv30RBRBm
— Tiger Shroff (@iTIGERSHROFF) September 18, 2017
नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. टायगरने सोशल मीडियावर सिनेमाच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये टायगरसोबत दिशा पटानी, निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना टायगरने लिहिले की, ‘…आणि ‘बागी २’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली.’
‘बागी २’ हा सिनेमा पुढील वर्षातील सर्वात महागडा अॅक्शनपट असणार असे म्हटले जात आहे. या सिनेमात अनेक आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक, तंत्रज्ञांचा यांचा सहभाग आहे. थायलंड, हाँगकाँग, लॉस एंजलिस, अमेरिका आणि चीन या देशातील अनेक तांत्रिक आणि अॅक्शन दिग्दर्शक या सिनेमात सहभागी होणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी २७ एप्रिलला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
. @iTIGERSHROFF 's #Baaghi2 will release on Apr 27th 2018! @FoxStarIndia pic.twitter.com/V0w6tZe2LT
— Ramesh Bala (@rameshlaus) May 2, 2017
‘बागी’ सिनेमात श्रद्धा कपूर होती, त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वलमध्येही ती असेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच घडले. ‘वर्षम’ या तेलगू चित्रपटावर ‘बागी २’ चे कथानक आधारित आहे. आधीच्या ‘बागी’चे दिग्दर्शन शब्बीर खानने केलं होतं. तर ‘बागी २’चं दिग्दर्शन कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान करणार आहे.