scorecardresearch

Video: टायगर श्रॉफच्या चाहत्याने १३ फूट उंचीवरुन मारली उडी आणि…

टायगर मात्र चांगलाच भडकला होता

tiger shroff
अभिनेता टायगर श्रॉफ

बॉलिवूड सिनेमांचे लाखो चाहते आहेत. चित्रपटगृहात कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी एक सुचना लिहिलेली असते. यात सिनेमात दाखवले गेलेली साहसी दृश्य ही पारंगत व्यक्तीने मार्गदर्शनाखाली केलेली असतात. त्यामुळे तुम्ही ही साहसी दृश्य कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय करु नका अशी सूचना देण्यात आलेली असते. पण फार कमी लोक असतात जे ही सूचना गांभीर्याने घेतात. काही लोक तर आपले आयुष्य संकटात टाकून सिनेमात दाखवलेली साहसी दृश्य करण्याचा प्रयत्न करतात. असेच काही तरी टायगर श्रॉफच्या एका कट्टर चाहत्याने केले. त्याने सुमारे १३ फुट उंच भिंतीवरुन उडी मारली.

अमन टायगेरियन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या अकाऊंटचे नाव पाहताच तो टायगरचा कट्टर चाहता असणार हे लक्षात येते. अमनने या ट्विटला कॅप्शन देताना म्हटले की, ‘मी उंचावरुन उडी मारून माझ्या भितीवर विजय मिळवला आहे. खाली उभं राहिल्यावर सगळ्याच गोष्टी फार सोप्या वाटतात. पण जेव्हा आपण वर येतो आणि स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरंच सांगतो फार भिती वाटते. मी एक सुपरहिरो असल्याचे स्वतःला सतत बजावत होतो. मला नेहमीच प्रोत्साहित करण्यासाठी टायगर तुझे आभार.’

अमनच्या या ट्विटवर आनंदी होण्यापेक्षा टायगर मात्र चांगलाच भडकला होता. त्याने अमनला ट्विटरवरच खडेबोल सुनावले. टायगर म्हणाला की, ‘माफ कर, पण तू हे जे काही वागलास ते मूर्खपणाचे होते. स्वतःचे जीवन कधीही धोक्यात घालू नका. सिनेमात अॅक्शन हिरो जेव्हा अशी दृश्य चित्रीत करत असतो तेव्हा त्याच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली गेलेली असते. त्यामुळे पुन्हा असे कधीही करण्याचा प्रयत्न करु नकोस.’

टायगरच्या या ट्विटमुळे अमनला फारच दुःख झाले. त्याने टायगरला परत ट्विट करत म्हटले की, ‘असं पुन्हा वागणार नाही, हे मी तुला वचन देतो. तु दुखावशील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. खरेच मला फार वाईट वाटत आहे. पुढच्यावेळी मी माझ्या सुरक्षेची अधिक काळजी घेईन. जमलं तर मला माफ कर.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2017 at 13:30 IST

संबंधित बातम्या