बॉलिवूड अभिनेता गोविंदाने चित्रपटसृष्टीत ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. गोविंदाचा पहिला चित्रपट हा १९८६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गोविंदा आणि अभिनेत्री नीलमची जोडी दिसली होती. या जोडीने सगळ्यांची मने जिंकली आणि त्यादोघांनी  त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. गोविंदा आणि नीलमने १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. नंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एवढंच नाही तर गोविंदाला नीलमशी लग्न देखील करायचे होते. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोविंदाने ‘स्टारडस्ट मॅग्झिन’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याच्या रिलेशनशिपपासून त्याचं लग्न सुनीताशी का झालं इथपर्यंत. “माझी आणि नीलमची भेट पन्नालाल मेहता यांच्या ऑफिसमध्ये झाली होती. नीलमने पांढऱ्या रंगाची शॉर्टस परिधान केली असून ती देवदुतासारखी दिसत होती. ती मला हॅलो म्हणालो, माझं इंग्रजी चांगलं नसल्याने मी तिच्याशी बोलण्यात का कू करत होतो. मला याची देखील भीती वाटतं होती की मी सेटवर तिच्याशी कसं बोलणार. मला नीलम विषयी आणखी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आणि माझ्याकडे सगळं असूनही मी एवढा घाबरत का होतो, मला माहित नाही,” असे गोविंदा म्हणाला.

पुढे तो म्हणाला की, “मी घरी सुद्धा नीलमबद्दल बोलायचो. एवढंच काय तर सुनीताशी माझा साखरपुडा झाल्यानंतर मी तिला नीलम सारखी रहा म्हणायचो. मी सुनीताला म्हणायचो की तू नीलमकडून शिकलं पाहिजे. एकदा सुनीताला या सगळ्या गोष्टींचा राग आला आणि ती नीलम विषयी रागात काही तरी बोलली, मला तेव्हा एवढा राग आला की मी सुनीताशी साखरपुडा मोडला. माझं लग्न नीलमशी झालं पाहिजे अशी माझ्या वडिलांची देखील इच्छा होती. कारण त्यांना तिचा स्वभाव प्रचंड आवडायचा. मात्र, माझ्या आईने मला सांगितले की मी सुनीताला शब्द दिला आहे आणि ते पूर्ण झालचं पाहिजे.”

गोविंदा पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही अचानकपणे एकमेकांना भेटतो तेव्हा तिला पाहून मला खूप बरं वाटतं. पण माझं हृदय आजही तिला पाहिल्या नंतर तिथेच थांबतं. मी निराश होऊन किंचाळत असल्यासारखे मला वाटते. फक्त मी सुनीताशी लग्न केल्याचे वचन दिले नसते तर.”

आणखी वाचा : जॉनी लिव्हरची लेक गेल्या आठ वर्षांपासून करते करिअरमध्ये संघर्ष, केला मुलाखतीमध्ये खुलासा

गोविंदा आणि सुनीताने ११ मार्च १९८७ मध्ये लग्न झालं आहे. गोविंदाने सुनीताशी लग्न केल्यानंतर त्यांनी ही माहिती ४ वर्ष सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. गोविंदाच्या लग्नानंतर काही वर्षांनंतर नीलमने ऋषी सेठीयाशी लग्न केले. मात्र, काही वर्षांनंतर त्याचा घटस्फोट झाला. २०११ मध्ये नीलमने अभिनेता समीर सोनी सोबत दुसरे लग्न केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To marry neelam govinda broke his engagement with his fiance know their love story dcp
First published on: 01-06-2021 at 19:11 IST