Tom Cruise and Ana de Armas Breakup : अभिनेत्री अमीषा पटेलने ज्याच्याबरोबर ‘वन नाईट स्टँड’ करायची इच्छा व्यक्त केली होती, त्या अभिनेत्याचं ब्रेकअप झालं आहे. मागच्या काही दिवसांपासून या अभिनेत्याच्या चौथ्या लग्नाची चर्चा होती. पण आता त्याचं ब्रेकअप झालं आहे. ६३ वर्षांचा हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुझ व त्याची २६ वर्षांनी लहान अॅना डी आर्मास वेगळे झाले आहेत.
हॉलीवूडमधील पॉवर कपलने अधिकृतपणे नातं संपवलं आहे. सुपरस्टार टॉम क्रुझ आणि अॅना डी आर्मास जवळपास नऊ महिने एकत्र घालवल्यानंतर वेगळे झाले. फेब्रुवारीमध्ये टॉम व अॅना एकत्र आले होते. पण या नात्यात आता स्पार्क राहिलेला नाही, हे लक्षात आल्यानंतर चांगल्या संबंधांवर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
टॉम क्रूझ व अभिनेत्री अॅना डी आर्मास ब्रेकअप
या स्टार्सच्या जवळच्या एका सूत्राने द सनला याबद्दल माहिती दिली. “टॉम आणि अॅना यांनी एकत्र चांगला वेळ घालवला, पण त्यांचं ब्रेकअप झालं आहे. ते आयुष्यात नेहमी मित्र राहतील, पण आता ते डेटिंग करत नाहीयेत,” असं सूत्राने सांगितलं.
टॉम क्रूझ व अभिनेत्री अॅना डी आर्मास यांच्याबद्दलची ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघांच्याही लग्नाच्या बातम्या येत असताना अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रेकअपनंतर ते परिपक्वतेने सगळ्या गोष्टी हाताळत आहेत. “अॅना हिला आधीच टॉमच्या पुढच्या चित्रपटात कास्ट केलंय, त्यामुळे ते ब्रेकअपनंतरही एकत्र काम करतील,” असं सूत्रांनी सांगितलं. टॉम व अॅना एका सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

टॉम व अॅना या वर्षाच्या सुरुवातीला व्हर्मोंटमध्ये सुट्टी घालवताना हातात हात घालून फिरत होते, तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दोघे माद्रिद आणि लंडन येथे रोमँटिक ट्रिपवर गेले. मग डेव्हिड बेकहॅमच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही उपस्थित राहिले होते. दोघेही स्कायडायव्हिंग करताना किंवा अंतराळात लग्न करतील, अशा चर्चा असताना आता ते वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे.
टॉम क्रुझचे तीन घटस्फोट झाले आहेत. अॅनाबरोबर तो चौथं लग्न करणार असं म्हटलं जात होतं. पण आता त्यांचं ब्रेकअप झालं आहे.
अमीषा पटेलचा क्रश आहे टॉम क्रुझ
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलला टॉम क्रुझ खूप आवडतो, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं. “मला टॉम क्रूझ खूप आवडतो. माझ्या खोलीत फक्त टॉम क्रूझची पोस्टर्स होती. तो नेहमीच माझा क्रश राहिला आहे. मी नेहमीच गमतीत म्हणते की तो एकमेव माणूस आहे ज्याच्यासाठी मी माझी सगळी तत्वे बाजूला ठेवू शकते. मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. जर मला विचारलं की मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करू शकते का? तर हो, मी करू शकते,” असं अमीषा पटेल म्हणाली होती.