मिशन इम्पॉसिबल स्टार टॉम क्रुझ कायमच आपल्या दमदार अभिनयाने नवा बेंचमार्क सेट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असतो. ‘मिशन: इम्पॉसिबल’ चा सातव्या आणि आठव्या सीरिजचं बॅक टू बॅक शूटिंग सुरू करण्यात आलंय. या सीरिजच्या शूटिंग सेटवरचा नवा बीटीएस व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका दरीतील तुटलेल्या ट्रॅकवरून ट्रेन कोसळताना दिसून येतेय. हा शानदार अॅक्शन सीन नुकतंच डर्बीशायरमध्ये शूट करण्यात आलाय. ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ च्या लेसेस्ट स्टंट शूटिंग दरम्यान आजूबाजूला उपस्थित असलेल्या स्थानिक फोटोग्राफर आणि लोकांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ च्या सेटवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

‘मिशन: इम्पॉसिबल’ स्टार टॉम क्रुझ आणि सीरिजच्या सातव्या सीजनची टीम एका सीनचं शूट करत आहेत. या सीनमध्ये एक ट्रेन एका खडकावर आदळल्यानंतर कोसळताना दाखवण्यात आलंय. डर्बीशायरच्या स्टोनी मिडलटनमध्ये हा सीन शूट करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती. स्थानिक छायाचित्रकार जिमने सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलंय. ” 20 मिनिटांपूर्वी झालेल्या या चित्रीकरणासाठी 5 महिन्यापासून वाट पाहत होतो.. मिशन: इम्पॉसिबलच्या शूटिंगवेळी टॉम क्रुझही उपस्थित होता. आश्चर्यकारक दिवस !!” असं त्याने या कॅप्शन देखील लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by VillagerJim (@villagerjim)

‘मिशन: इम्पॉसिबल’ स्टार टॉम क्रुझ जेव्हा हा स्टंट शूट करत होता , त्यावेळी बॅकग्राउंडला एक हेलिकॉप्टर देखील उडताना दिसून येत आहे.

 

हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुझ स्वतः सर्व स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोरोना महामारीमुळे ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ चं शूटिंग आणि रिलीज थांबवण्यात आलं होतं. आता येत्या २०२२ मध्ये ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ रिलीज करण्याची योजना दिग्दर्शक क्रिस्टोफर मैकक्वेरी आहे. या सीरिजमध्ये टॉम क्रुझ व्यतिरिक्त हेन्री, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी आणि फ्रेडरिकही यात काम करत आहेत. या सीरिजचा पुढचा भाग ‘मिशन: इम्पॉसिबल 8’ 2023 मध्ये रिलीज करण्याचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.