ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेता आणि ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ फेम टॉम साइझमोर यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. टॉम हे ६१ वर्षांचे होते. त्यांचे मॅनेजर चार्ल्स लागो यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आपल्या निवेदनात चार्ल्स म्हणतात की, “१८ फेब्रुवारी रोजी टॉम साइझमोरला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्रेन एन्युरिझमचा त्रास होता. कॅलिफोर्नियातील बरबँक येथील रुग्णालयात या अभिनेत्याने शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. तो झोपेत असताना त्याला प्राण गमवावे लागले.”

‘ब्लॅक हॉक डाउन’ सारख्या बऱ्याच उत्तम चित्रपटात काम करणारे टॉम साइझमोर डेट्रॉईटचे रहिवासी होते. त्यांची आई शहराच्या लोकपालसाठी काम करत होती. त्यांचे वडील वकील आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. साइझमोर यांनी वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आणि फिलाडेल्फियामधील टेंपल युनिव्हर्सिटीमधून थिएटरमध्ये बॅचलर पदवी मिळवली.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘कुत्ते’ चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज; वाचा कधी, कुठे पाहायला मिळणार?

टॉमला दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोनच्या ‘बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. हा चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. टॉमने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. १९९५ चा कल्ट क्लासिक चित्रपट ‘हीट’ मध्ये टॉम रॉबर्ट डी नीरोबरोबर दिसले. याबरोबरच टॉम हँक्सबरोबर केलेल्या ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर टाकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॉम यांचे वैयक्तिक आयुष्य वेगवेगळ्या वादग्रस्त करणांमुळे चर्चेत होते. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे त्यांना अनेकदा तुरुंगातही जावं लागलं होतं. हॉलिवूड ब्युटी मॅडम हेडी फ्लीसबरोबरच्या नात्यामुळेही टॉम चर्चेत होते. २००३ मध्ये फ्लीसने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. यामुळे टॉमला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. सिझमोर यांनी आरोप फेटाळून लावले.