जवळपास ३ महिने चाललेल्या ‘खतरों के खिलाडी १२’ या शोने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. नुकतीच या शोच्या १२ व्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आणि हा सीझन तुषार कालियाने जिंकला. अर्थात तुषार हा सीझन जिंकेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होतीच. तुषारने फैजल शेख आणि मोहित मलिक यांना मात देत ‘खतरों के खिलाडी १२’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. ट्रॉफी व्यतिरिक्त तुषार कालियाला मोठी रोख रक्कम आणि कार भेट म्हणून मिळाली आहे.

तुषार कालिया हा व्यवसायाने मॉडेल, कोरिओग्राफर, डान्सर आणि स्टेज डायरेक्टर आहे. ३६ वर्षीय तुषार कालिया मूळचा चंदीगढचा आहे. तुषार एक उत्तम डान्सर असून त्याआधी तो ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या सहाव्या आणि सातव्या सीझनमध्ये कोरिओग्राफर म्हणून दिसला आहे. एवढंच नाही तर त्याने काही डान्स रिअलिटी शोचा परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.

आणखी वाचा- “तुझा अभिमान वाटतो…” नेटकऱ्यांकडून आलिया भट्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

खतरों के खिलाडी १२ मध्ये तगड्या स्पर्धकांचा सामना करत तुषारने या सीझनच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. या विजेतेपदासह तुषारला विनिंग ट्रॉफी, एक ब्रॅण्ड न्यू कार आणि जवळपास २० लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे. तुषारच्या कामाबद्दल बोलायचं तर तो या शोमध्ये सहभागी होण्याआधी ‘झलक दिखला जा’मध्ये कोरिओग्राफर, तर ‘डान्स दिवाने’ सारख्या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे.

आणखी वाचा-“अमित शाह जी…” रोहित शेट्टीच्या ‘त्या’ पोस्टच्या कॅप्शनने वेधले सर्वांचेच लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शेट्टी होस्ट करत असलेला हा शो टीव्हीवरील लोकप्रिय शोपैकी एक मानला जातो. ‘खतरों के खिलाडी १२’ जिंकणे तुषारसाठी सोपे नव्हते. मात्र त्याला या आधीच रिअॅलिटी शोचा अनुभव होता. व्यवसायाने कोरिओग्राफर असलेल्या तुषार कालियाने ‘ऐ दिल है मुश्किल’ या बॉलिवूड सिनेमासाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे.