करोना महामारीमुळे सगळ्यांचेचं आर्थिक नुकसान झाले आहे. या महामारीच्या कचाट्यातून कलाकारही वाचले नाहीत. या दरम्यान बऱ्याच कलाकारांनासुद्धा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. यातील एक कलाकार म्हणजे अभिनेता रोनित रॉय. रोनित रॉय हा एक लोकप्रिय अभिनेता आहे, त्याच बरोबर त्याची ‘एस सिक्योरिटी’ नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी अनेक लोकप्रिय कलाकारांना बॉडीगार्ड उपलब्ध करून देते. लॉकडाऊन आणि करोनामुळे रोनितचे सगळा व्यवसाय ठप्प झाला. त्याचे क्लायंट त्याला सोडून गेले असून त्याच्यावर कंपनी बंद करण्याची वेळ आली होती. मात्र अश्या कठीण प्रसंगी फक्त बिग बी म्हणजे अमितभ बच्चन आणि अक्षय कुमार पाठिशी उभे राहिले होते. असे रोनित रॉय याने कठीण काळाबद्दल बोलताना एका मुलाखतीत सांगितले आहे.

अभिनेता रोनित रॉयने मार्च २०२०मध्ये त्याची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या कर्मचाऱ्यांना त्याने पैसे देऊन ठेवले होते, कारण प्रत्येकाला आर्थिक गरज होती. त्याने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत देताना सांगितले की,”या कठीण काळात माझे सगळे क्लायंटस् सोडून गेले. मात्र अमितभ बच्चन आणि अक्षय कुमार माझ्या पाठिशी उभे राहिले होते. त्यांनी मला प्रोत्साहन दिले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronit Boseroy (@ronitboseroy)


यापुढे रोनितने सांगितले की, “जेव्हा पुन्हा काम सुरू केलं तेव्हा मी माझ्या ११० कर्मचाऱ्यांना परत बोलावले. त्यातील ४० जणांनी परत यायला नकार दिला.” जे क्लायंटस् रोनितला सोडून निघून गेले त्यांच्याकडे पैश्याची काहीच कमी नव्हती. त्यामुळे जेव्हा सोडून गेलेल्या क्लायंट्सनी पुन्हा रोनित सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याने चक्क नकार दिला.