अभिनेत्री सारा खान शुक्रवारी रात्री ओशिवरा येथे झालेल्या अपघातात किरकोळ जखमी झाली. शुक्रवारी मध्यरात्री एका वाढदिवसाच्या पार्टीहून गाडीतून परतत असताना मेगा मॉल समोर हा अपघात झाला.
या गाडीत तिच्यासह एकूण पाच जण होते. गाडी तिचा मित्र चालवत होता. मेगा मॉल समोरील दुभाजकावर गाडी आदळली आणि उलटली. या अपघातात सुदैवाने कुणी गंभीर जखमी झाले नसले तरी सारा खानला किरकोळ दुखापत झाली.
क्रेनच्या मदतीने नंतर तिची गाडी हलविण्यात आली. वाहनचालकाने मद्यपान केले होते का ते वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. गाडी भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सारा खान ही २०१० च्या ‘बिग बॉस’ मधील सहभागामुळे चर्चेत आली होती. अभिनेता अली र्मचट याच्याशी लग्न करून नंतर घटस्फोटही झाला
होता.