राहुल महाजनला ‘या’ अभिनेत्रीने लगावली कानशिलात, कारण…

सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुलाला राहुल महाजनला छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रेनु पारिखने कानशिलात लगावली आहे. लोकप्रिय शो ‘नच बलिए’च्या सेटवर हा किस्सा घडला असून सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे राहुल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रेनु पारिख आणि राहुल हे दोघेही नच बलिएच्या ग्रॅण्ड प्रिमियरमध्ये परफॉर्म करणार आहेत. या डान्सचा एक भाग म्हणून श्रेनुनीला राहुलच्या कानशिलात लगावायची होती. त्यामुळेच तिने राहुलला मारलं आहे. मात्र त्यांच्या या अॅक्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

राहुलला कानाखाली मारणं श्रेनुनीला शक्य नव्हतं, ती प्रचंड संकोचली होती. मात्र तिची ही अडचण राहुलने दूर केली. त्याने सेटवरील वातावरण कन्फर्टेबल केलं आणि श्रेनुनीला हा सीन करण्यास प्रोत्साहित केलं. त्यानंतर श्रेनुने राहुलच्या कानशिलात मारली.
“राहुलसोबत काम करताना खूप छान वाटलं. मात्र त्याला मारणं माझ्यासाठी फार कठीण होतं. परंतु राहुलने मला प्रोत्साहन दिलं आणि मी हे करु शकले”, असं श्रेनुने सांगितलं.

दरम्यान, छोट्या पडद्यावरील नच बलिए हा शो विशेष लोकप्रिय आहे. या शोचे अनेक चाहते आहे. यंदा या शोचं हे नववं पर्व असून या शोचं सूत्रसंचालन सलमान खान करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tv rahul mahajan slapped by shrenu parikh on nach baliye 9 set ssj