अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ विरुद्ध चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला असला तरी या चित्रपटात तब्बल ८९ ठिकाणी कट्स सुचविण्यात आल्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी संताप व्यक्त केला आहे. पंजाबमधील वास्तवावर हा चित्रपट बेतलेला असताना बोर्डाने चित्रपटाच्या नावातूनच पंजाब हा शब्दच काढून टाकण्यास सूचवले आहे. यासह पंजाबमधील जालंधर, चंदीगढ, अमृतसर, लुधियाना या शहरांची नावेही चित्रपटातील संवादातून वगळण्यास सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर खासदार, आमदार, निवडणुका, पक्ष कार्यकर्ते, संसद हे शब्दही काढून टाकण्याची सूचना करण्यात आली आहे. या सर्व कट्स विरोधात चित्रपटकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. ‘उडता पंजाब’सारखा प्रामाणिक चित्रपट नाही आणि जो पक्ष या चित्रपटाचा विरोध करेल त्याला प्रत्यक्षात अंमली पदार्थाच्या प्रसिद्धीबद्दल अपराधी ठरवले पाहिजे, अशा कडक शब्दांत अनुरागने ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला होता. आता मला उत्तर कोरियाला विमान पकडून जायची गरज नाही. तिथली हुकूमशाही इथेच अनुभवता येत आहे, असा टोलाही अनुरागने हाणला होता. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपटात कोणकोणते कट्स सुचविण्यात आले आहेत, त्याची यादीच खाली दिली आहे.
udta-punjab-cuts