सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे.

चित्रा वाघ यांनी एफआयआर नोंदविल्यानंतर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी “उर्फी मला कुठे दिसली, तर तिला मी थोबडवून काढेन”, असं विधान केलं होतं. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर उर्फीने दिल्लीच्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं होतं. भाजपाशी संबंधित असलेल्या आरोपीविरोधात आवाज उठवणार का?, असा प्रश्न उर्फीने चित्रा वाघ यांना विचारला होता.

हेही वाचा>> “मी तयार नव्हते…”, लग्नानंतर महिन्याभरातच पाठकबाईंचा खुलासा

उर्फीने आता पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये उर्फीने भीती व्यक्त केली आहे. “राजकारण्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं तिने म्हटलं आहे.  

हेही वाचा>> “एक सुंदर मुलगी मला भेटायला आली आणि…”, प्रसाद ओकने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

urfi javed

हेही वाचा>> “मला विजेता…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रा वाघ व उर्फी जावेद यांच्या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना सुषमा अंधारेंनी केतकी चितळे, अमृता फडणवीस व कंगना रणौत यांचे काही फोटो शेअर करत खोचक सवाल केला आहे.